कै विद्याधर श्रीपाद शिरसाट यांच्या दहाव्या स्मृतिदिन निमित्त आयोजन
⚡सावंतवाडी ता.१९सहदेव राऊळ-: विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे सोमवार १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कै. विद्याधर श्रीपाद शिरसाट यांच्या दहाव्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस, विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस व पारिजात फ्रेंड सर्कल आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटात घेण्यात येणार आहे. कथेसाठी विषयाचे बंधन नाही. स्पर्धेसाठी प्रशालेतून प्रत्येक गटात एक याप्रमाणे विद्यार्थी पाठवायाचे आहेत. स्पर्धेत गट क्र. १ पहिली ते चौथी प्रथम क्रमांक – ५०१/-, द्वितीय क्रमांक – ३०१/-, तृतीय क्रमांक – २०१,उत्तेजनार्थ- २, गट क्र. २ पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक- ७०१/-, द्वितीय क्रमांक- ५०१/-, तृतीय क्रमांक – ३०१/-, उत्तेजनार्थ- २, गट क्र. ३ आठवी ते दहावी प्रथम क्रमांक – १००१/-, द्वितीय क्रमांक – ७०१/-, तृतीय क्रमांक- ५०१/-, उत्तेजनार्थ- २ अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकाना स्मृतिचषके देण्यात येणार आहेत..
स्पर्धकासाठी गट क्र. १ साठी ४ मिनिट, क्र. २ साठी ५ मिनिट गट क्र. ३ साठी ६ मिनिट अशी वेळ आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांची नावे २८ जुलै पर्यंत अॅप मोबाईल नंबर ९४०३३६७८५६ या व्हाट्सअँप नंबरवर पाठवावीत. या कथाकथन स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनविद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.
