आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

⚡सावंतवाडी ता.१८-: आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पन्नासहून अधिक आमदारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय जीवनात केसरकर यांना यश मिळो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशा शुभेच्छा शिंदे व सहकाऱ्यांनी दिल्या. दरम्यान केसरकर यांना कुटुंबाच्यावतीने सुध्दा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांची कन्या सोनाली, जावई सिद्धार्थ, नातू अर्जुन व अन्य कुटुंबीय उपस्थित होते.

You cannot copy content of this page