नातेवाईकांनी वर्तविली घातपाताची शक्यता
⚡सावंतवाडी ता.१८-: मालेभाट सालीगाव येथे सावंतवाडी तालुक्यातील एका युवकाचा मृतदेह सापडला असून, त्याचा घातपात झाली असल्याची शक्यता त्याच्या नातेवाईकांनी वर्तवली आहे. रोशन पाटील ( वय २३ वर्ष; रा. बुर्डीपुल) असे त्या युवकाचे नाव असून, तेथील तलावात त्याचा मृतदेह आढळला आहे.
घटना घडली त्या ठिकाणी मात्र कोणतीही वस्तू, अथवा कपडे सापडले नसल्याने त्याचा घातपात झाला असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी ती आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवला आहे. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतर खरे कारण समजणार असून, त्यानंतरच पुढील भूमिका घेऊ असे नातेवाईकांनी सांगितले आहे
