मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ओरोस ता.१८-:

स्वतःच्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून मोटारसायकलस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून रवींद्र नानासाहेब पंडोलकर याची मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम फडतरे यांनी सबळ पुरव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. अतिश खानोलकर यांनी काम पाहिले .
२० फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई गोवा महामार्गावर ओरोस बुद्रुक खर्यवाडी येथे हॉटेल कोकण विहारच्या समोर हा अपघात झाला होता. यातील संशयित आरोपी रविंद्र पडोलकर याने मुंबई गोवा हायवेवरून कोकण विहार हॉटेलकडे वळताना स्वतःचे ताब्यातील होंडा अमेझ कार रॉन्ग साईडला वळवून तसेच पाठीमागुन येणाऱ्या वाहनाकडे दुर्लक्ष करून मोटरसायकल वाहनाला धडक दिली. यात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला त र त्याच्या पाठीमागे बसलेली व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कारचालक रविंद्र पडोलकर याच्या विरुद्ध मोटारसायकलस्वाराच्या गंभीर दुखापतीस व मोटार सायकलच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या मृत्यूस कारण ठरल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्यन्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आरोपी रविंद्र पडोलकर याची न्यायालयाने साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

You cannot copy content of this page