सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील मराठा गुणवंत दहावी, बारावी मुलांचा होणार सत्कार

२५ जुलै पर्यंत नाव नोंदणी करण्याचे संजू परब यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळ तर्फे दहावी व बारावी पदवी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान सोहळा करण्यात येणार आहे.

तरी दहावी परीक्षेत 92 टक्के हुन अधिक गुण व बारावी परीक्षेत 85 टक्के होऊन अधिक गुण व पदवी परीक्षेत 75% हून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांनी आपली नावे येत्या 25 जुलै पूर्वी द्यावयाची आहेत.

सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळ तर्फे गुणवंत गौरव सोहळा केला जाणार आहे तरी विद्यार्थ्यांनी व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पहिले तीन मराठा समाजातील विद्यार्थ्यांची नावे पाठवायचे आहेत ही नावे खजिनदार भूपेंद्र सावंत 94 21 14 52 88 या नंबर वर नोंद करावयाचे आहे तसेच उभा बाजार येतील ओंकार फोटो स्टुडिओ येथे आपली नावे द्यावयाचे आहेत असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजू परब व सचिव एडवोकेट संतोष सावंत व कार्याध्यक्ष दत्ताराम सडेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page