बेकायदा गुरांची वाहतूक: कोल्हापुरातील एकावर गुन्हा

बांदा येथे रविवारी रात्री उशिरा करण्यात आली कारवाई

बांदा/प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर बांदा कट्टा कॉर्नर येथे गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने बेकायदा गुरांची वाहतूक करणार्‍या आनंदा पाटील (वय ३८, रा. कागल -कोल्हापूर) याच्याविरोधात बांदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ३ गाई व १ वासरू यांना बिचोली -गोवा येथील गोशाळेत स्थलांतरित केले. बांदा शहरातील जागरूक नागरिकांनी गुरांच्या बेकायदा वाहतुकीचा पर्दाफाश केला.
. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने गुरांची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती बांदा शहरातील काही जागरूक नागरिकांना मिळाली होती. त्यानुसार रात्री साडेदहा वाजता महामार्गांवर कट्टा कॉर्नर येथे सापळा रचण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार बोलेरो पिकअप (एमएच ०९ ईएम ००७६) तपासणीसाठी थांबविण्यात आली. त्यावेळी मागील हौदयात ३ गाई व एक वासरू आढळले. स्थानिकांनी चौकशी केली असता चालक समर्पक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे याची कल्पना बांदा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गुरांची बेकायदा वाहतूक केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करत गाडी जप्त केली. गुरांना स्थानिकांच्या मदतीने गोव्यातील गोशाळेत स्थलांतरित करण्यात आले.
. यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, निलेश सावंत-पटेकर, शामू धुरी यांच्यासह स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page