भिकाजी धुरी : बांदा व्ही.एन.नाबर प्रशालेच्या पालकांची सभा
⚡बांदा ता.१८-: “चांगल्या शिक्षकांशिवाय चांगले विद्यार्थी घडत नाहीत, गेली तेरा वर्षे नाबर प्रशालेचा दहावीचा निकाल 100% लागत आहे शिवाय निकालही नेहमी दर्जेदार असतो,याचे सारे श्रेय शिक्षकांना जाते,विना अनुदानित शाळा चालवणे ही तारेवरची कसरत असते पण कोणतीही तक्रार न करता हे शिक्षक वर्षानुवर्षे शाळेच्या यशाचा चढत आलेख पुढे नेत आहेत या शाळेवर ,येथील दर्जेदार शिक्षणावर व मेहनती शिक्षकांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्याला या प्रशालेत प्रवेश घेऊन द्यावा व त्यांचे उज्वल भवितव्य घडवावे ,”असे विचार श्री. भिकाजी धुरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .
व्ही.एन.नाबर प्रशालेच्या पहिल्या पालक सभेच्या वेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मेडिअम स्कूल, बांदा प्रशालेची 2022-23 या शैक्षणिक वर्षाची पहिली पालक सभा शनिवार दिनांक 16 जुलै रोजी श्री विठ्ठल रखुमाई सभागृहात संपन्न झाली.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी श्री भिकाजी धुरी, गव्हरनिंग काउन्सिलिंगचे सदस्य नारायण पित्रे,मनोज कामत, शंकर उर्फ भाऊ वळंजू,राजेश गोवेकर ,प्रकाश वालावलकर ,सुरेश गावडे ,तसेच प्रशांत कामत, अविनाश पंडित प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ .होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत तसेच इंग्लीश व विज्ञान ऑलिम्पियड परिक्षांमध्ये भरघोस यश संपादन केलेल्या कु.मधुरा पाटील हीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युती राऊळ,तन्वी महाबळ, वैभवी धुरी, संकेत देसाई, पायल गावकर ,मिताली कोकाटे या पहिल्या पाच क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.प्रशालेच्या शिक्षिका हेलन रॉड्रीग्स यांनी वार्षिक अहवाल सभेपुढे सादर केला तर क्रीडा शिक्षक प्रशांत देसाई यांनी क्रीडा अहवालाचे वाचन केले.राकेश परब यांनी एम एस एफ सी विभागाची माहिती सभेला दिली.
प्रशालेला स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या सर्व शिपाई वर्गाला गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पालक सुधाकर डेगवेकर यांनी भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.प्रशालेत नव्याने सुरु झालेल्या एड्युवेट अभ्यासक्रमाबद्दल पालकांना योग्य ती माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
पालक वर्गातुन सुधाकर डेगवेकर , प्रशांत कामत, अक्षया पावसकर आदी पालकांनी प्रशालेविषयी आपली मनोगते सभेत मांडली.
अध्यक्षांच्या परवानगीने शिक्षक पालक संघ स्थापन करण्यात आला .
दिव्या सावंत,अक्षया पावसकर ,राजन राणे ,रेश्मा सावंत,अमर घोगळे, दीपक नाईक,दिवाकर म्हावळंकर, अश्विनी परुळेकर,सरवल्ली मलीक,रश्मी तेली,प्रिया कामत, रसिका सावंत , तनिशा सावंत या पालकांची शिक्षक पालक संघाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली तसेच अल्पिता गाड,लीना पाटील ,सिया महाबळ ,मनोज कामत, अविनाश पंडित यांना निमंत्रित म्हणून संघात घेण्यात आले.
सौ.तनिशा सावंत यांची सर्वानुमते शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सभेचे सूत्रसंचालन श्रीम रसिका वाटवे यांनी केले ,प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका
सौ.मनाली देसाई ,आभार प्रदर्शन सौ. शिल्पा कोरगावकर यांनी केले.
