देवबाग मोबारवाडी रस्त्यावर खड्डे व चिखलाचे साम्राज्य

⚡मालवण ता.१८-: देवबाग मधील मोबारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली असून सध्या पावसाळ्यात खड्ड्यांनी मोठे रूप धारण करून त्यात चिखलमय पाण्याचे साम्राज्य असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या चिखलात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनचालक या खड्ड्यांत पडत असल्याचे चित्र आहे.

देवबाग मोबारवाडी रस्ता खड्डेमय झाला असून यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या मार्गावरील ला-कासा रॉयल रिसॉर्ट समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाळी चिखलाचे साम्राज्य असून यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा कोणताही अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने वाहने खड्ड्यात अडकून अपघात होत आहेत. त्यामुळे या समस्येकडे देवबाग ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन योग्य ती खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.

You cannot copy content of this page