रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीची प्रतिमा जनमानसात उंचावण्यासाठी मुलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन निर्माण करणार…

नूतन प्रेसिडेंट श्रीपाद पारकर यांनी व्यक्त केला विश्वास

देवगड (प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी या क्लबच्या माध्यमातून काम करीत असताना स्वतःला झोकून देऊन काम करण्याची संधी आपल्याला मिळाली व हे कार्य करीत असताना एक आत्मिक समाधान मिळाले ते समाधान शब्दात व्यक्त करणे अवघड असून रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगड ची प्रतिमा जनमानसात उंचावण्याकरिता व या क्लबच्या माध्यमातून गरीब होतकरू मुलांकरता त्याचप्रमाणे समाजातील गरजू गरीब नागरिकांकरिता आरोग्य विषयक सुविधा,व कायदेविषयक मार्गदर्शन निर्माण करून देण्याकरता विशेष प्रयत्न यापुढील काळात केले जातील .असा आत्मविश्वास रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीचे नूतन प्रेसिडेंट श्रीपाद पारकर यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या पदग्रहण सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.


रोटरी क्लब ऑफ मॅंगोसीटी देवगडचा नुतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा रविवार दिनांक १७ जुलै रोजी ईंद्रप्रस्थ हॉल येथे सकाळी ११ वा.संपन्न झाला.यावेळी रो.शरद पै (डीस्ट्रीक्ट गव्हर्नर ईलेक्ट ३१७० ) हे ईन्स्टॉलींग ऑफीसर तसेच .असिस्टंट गव्हर्नर रो.दिपक बेलवलकर,असिस्टंट गव्हर्नर रो.नीता गोवेकर,जी.एस्.आर रो.प्रणय तेली देवगड जामसंडे नगराध्यक्षा साक्षी प्रभू, प्रेसिडेंट हनिफ मेमन,सेक्रेटरी संजय धुरी, उपस्थित होते. .
सन २०२२-२३ करीतां प्रेसिडेंट म्हणून रोटे.श्रीपाद सदानंद पारकर,तर सेक्रेटरी म्हणून रो.सौ.मनस्वी महेश घारे,आणि ट्रेझरर रो.गौरव तुषार पारकर यांचा पद्ग्रहण सोहळा पार पडला.
या निमित्ताने प्रेसीडेंट हनिफ मेमन यांनी रोटरी च्या माध्यमातून अनेक लोकपयोगी कार्यक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून ,किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन,जयपूर फूट वाटप,आरोग्य शिबीर द्वारे जनतेला सुविधा पुरविल्याचे स्पष्ट केले.या सोहळ्याचे उदघाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले .वार्षिक अहवाल वाचन सेक्रेटरी संजय धुरी यांनी केले.
या निमित्ताने या सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड अल्फान्सो या बुलेटिन चे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
तसेच रोटेरियन यांच्या पाल्यांचा सत्कार,सायली घारे, स्वरूप डामरी आणि शालांत दहावी परीक्षेत तीन शाळांमधील प्रथम क्रमांक उत्तीर्ण मनस्वी बांदिवडेकर,निशा पाटील,तन्वी बदाने,पियुष पोकळे या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
नगराध्यक्षा साक्षी प्रभू
साक्षी प्रभू यांनी आपल्या मार्गदर्शनात रोटरी क्लब च्या कार्याचा गौरव करून,शैक्षणिक, सामाजिक,आरोग्य उपक्रमाबरोबर कोविड काळात या क्लब चे योगदान मोठे होते यापुढील काळात त्यांना नगराध्यक्षा या नात्याने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
या पद्ग्रहण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते ७५ वेळा रक्तदान करणारे उद्धव गोरे,व्होकेशनल अवार्ड सरिता मदन तारकर,रुचिदा मसाले चे मधुकर नलावडे यांचा गौरव करण्यात आला.
देवगड महाविद्यालय,उमाबाई बर्वे लायब्ररी,उमा मिलिंद पवार इंग्लिश मिडीयम स्कुल,याना पुस्तके प्रदान करण्यात आली.
एजी रो.नीता गोवेकर यांनी या वर्षी इमेजीन ही थीम असून समाजातील हतबल मांणसा समोर उभे राहणे महत्वाचे आहे यासाठी या माध्यमातून सर्वांची मैत्री घट्ट असावी असे सांगितले.
या वेळी रो दीपक बेलवलकर,रो.प्रणय तेली यांनी उपस्थितीतांशी सुसंवाद साधला.
रो.शरद पै
-इन्स्टॉलेशन ऑफीसर शरद पै यांनी आपल्या मार्गदर्शनात कोकणातील माझे मूळ गाव असून मी कोकणी माणूस आहे,जगाच्या नकाशावर देवगड हे गाव देवगड हापूस या जगप्रसिद्ध आंब्याने जोडलेले आहे त्या गावात रोटेरीचे स्थापना झाली ही बाब गौरवस्पद आहे.रोटरी क्लब च्या विकासात चांगले मेंबर,शिस्त आवश्यक असून या माध्यमातून गरजू माणसांपर्यंत पोहचणे व सामाजिक आरोग्य विषयक सुविधा ,किशोरवयीन मुलींकरिता अस्मिता उपक्रम राबविणे गरजेचे आहे.ही संस्था फार मोठी संस्था असून खेड्यापाड्यात समाजसेवा करण्याकरिता ही संस्था महत्वाची आहे असे सांगून रोटरी फाउंदेशन व क्लब च्या कार्याचा आढावा मांडला.
उर्वरित पदाधिकारी पुढील प्रमाणे प्रवीण पोकळे व्हाईस प्रेसिडेंट ,दयानंद पाटील सर्जंट ॲट आर्म्स, संजय धुरी एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी, सुनील दत्त पारकर जॉईंट ट्रेझरर, विजय बांदिवडेकर डायरेक्टर कम्युनिटी सर्विस, महेश घारे डायरेक्टर क्लब सर्विस, अशोक मुचुमाळे डायरेक्ट वोकेशनल सर्विस ,प्रकाश गायकवाड डायरेक्ट इंटरनॅशनल सर्विस, नरेश डामरी डायरेक्टर न्यू जनरेशन,सनीत आचरेकर, किरण पोकळे, चेअरमन मेंबरशिप, रमाकांत आचरेकर चेअरमन ऍडमिनिस्ट्रेशन ,अनुश्री पारकर चेअरमन रोटरी फाउंडेशन मनीषा डामरी चेअरमन सर्विस प्रोजेक्ट ,अनिल गांधी चेअरमन पब्लिक इमेज, अनिल कोरगावकर चेअरमन क्लब लिटरसि ,रुपेश पारकर चेअरमन फेलोशिप याप्रमाणे डायरेक्टर बोर्ड ने पद्ग्रहण केले सूत्रसंचालन रो.सौ .अनुश्री पारकर,रो.अनिल गांधी यांनी केले,तर आभार रो सेक्रेटरी मनस्वी घारे यांनी मानले.
: फोटो -१)रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या पद्ग्रहण सोहळ्यात उपस्थित पदाधिकारी व मान्यर,२)रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी या बुलेटिन चे प्रकाशन करताना मान्यवर (छाया-वैभव केळकर)

You cannot copy content of this page