देवगड (प्रतिनिधी)
देवगड पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक पदी सेवा बजावीत असलेले नाट्य लेखक दशरथ रंगराव चव्हाण यांनी लिहिलेले मराठी प्रायोगिक नाटक “आबांची बाय नि सगळ्यांची घाय ” या नाटकासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ महाराष्ट्र शासन यांचे कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र या नाटकातील कोणताही भाग न वगळता रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ अध्यक्ष श्रीरंग गोडबोले यांचेकडून प्राप्त झाले आहे.
या यशाबद्दल
पोलीस उपनिरीक्षक नाट्य लेखक दशरथ चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लेखक दशरथ चव्हाण हे वैभववाडी गणेश नगर येथील रहिवासी असून त्यांनी पोलीस प्रशासनात गेली ३३ वर्षे सेवा बजावीत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचले. आहेत.बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मक्तेदार कै. सखाराम आण्णा चव्हाण यांचे ते पुतणे आहेत.त्यांनी लिहिलेले दोन अंकी नाटक हे एका विधवा महिलेच्या जीवनावर आधारित असून या नाटकातील कोणताही भाग न वगळता रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने त्यांना कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र दिले आहे.श्री पावणाईदेवी
कलमंच तळवडे-बागतळवडे-
तळेबाजार या मंडळाचे १४ कलाकारांचा संच या नाटकात असून ३ स्त्री पात्र व ११ पुरुष पात्र यांचा सहभाग आहे.विशेषतः हे सर्व कलाकार हे स्थानिक देवगड तालुक्यातील आहेत.
आपल्या पोलीस प्रशासकीय सेवेत श्री चव्हाण यांनी अनेक उपक्रमांमधून नागरिकांचे प्रबोधन,समुपदेशन केले असून प्रशासनातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.या सेवेबरोबर स्वतः उत्तम अभिनय, लेखक,दिग्दर्शक,म्हणून सुपरिचित आहेत.
या पोलीस प्रशासनाच्या सेवेत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,जिल्हा पोलिस उपअधीक्षक नितीन बगाटे,उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे,देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे,तसेच जिल्हा पोलिस व देवगड पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांचे प्रोत्साहन मार्गदर्शन ,तसेच सर्व स्थानिक कलाकार ,नागरिक यांचे सहकार्यामुळे आपण या अभिनय क्षेत्रा बरोबर नाट्यलेखन क्षेत्रात यश प्राप्त केले आहे.असे त्यांनी आवर्जून सांगितले.
