तात्काळ नेटवर्कची समस्या सोडवा;ग्राहकांची मागणी.
⚡सावंतवाडी ता.१८-: मळेवाड मध्ये आयडिया च्या नेटवर्क चा खेळखंडोबा सुरू असून ग्राहक हैराण झाले आहेत.मळेवाड गावासाठी मळेवाड हेदुलवाडी येथे असलेल्या मोबाइल मनोऱ्यावरून आयडिया चे नेटवर्क पुरविले जात आहे.मात्र कालपासून गावात आयडिया च्या नेटवर्क ची समस्या ग्राहकांना होत असल्याने ग्राहकातुन नाराजी व्यक्त केली जात आहे.तात्काळ नेटवर्क ची समस्या सोडवावी अशी मागणी ग्राहक करत आहेत.
