कणकवली रेल्वेस्टेशनकडील गोठणदेवच्या झाडाची फांदी पडल्याने रस्ता झाला बंद

*⚡कणकवली ता.१७-:कणकवली रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या गोठणदेवकडील मोठ्या आम्रवृक्षाची फांदी रविवारी पहाटे २ च्या सुमारास मोडून पडली. त्यामुळे रेल्वेस्टेशनला लागून असलेला रिक्षास्टॅन्डकडील रस्ता बंद झाला होता.

रेल्वे स्टेशनकडे येणारा मुख्य रस्ता मात्र सुरळीत होता. घटनेची माहिती मिळतात कणकवली नगरपंचायतीचे सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर, यांच्यासह मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड, सतीश कांबळे, कचरा ठेकेदार मिथुन ठाणेकर, परबवाडी मित्रमंडळ व नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा मदतीने ही मोठी फांदी हटविण्याचे काम हाती घेतले.

You cannot copy content of this page