नेते अमित ठाकरे यांनी दिली नियुक्ती;सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळची जबाबदारी
सावंतवाडी,ता.१६: येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधीर राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याकडे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला व कुडाळ या चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. युवा नेते अमित ठाकरे यांच्या शिफारशीने त्यांनाही संधी देण्यात आली आहे. तर जिल्हासंपर्क अध्यक्ष म्हणून अमोल साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.
