फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट दुचाकीवर कारवाई

मालवण पोलिसांची कारवाईचा धडाका सुरू

मालवण दि प्रतिनिधी
बुलेटच्या सायलेन्सर मधून कर्णकर्कश आवाज करीत मालवणात धुडगूस घालणाऱ्या बुलेट चालकांवर मालवण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगाल्यानंतर पोलिसांनी आता फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या दुचाकी व ट्रिपल सीट चालकांवरही धडक कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

मालवणात सध्या बुलेट चालकांनी सायलेन्सर मधून कर्णकर्कश आवाज करीत धुडगूस घातल्यानंतर पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली. त्या सोबतच आता फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी व ट्रिपलसीट चालकांवरही धडक कारवाई मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब व अमित हरमलकर यांच्या माध्यमातून ही कारवाई मोहीम सुरू आहे.

तरी दुचाकीच्या नंबरप्लेट फॅन्सी स्वरूपात असतील तर त्या बदलून नियमानुसार नंबरप्लेट असाव्यात. तसेच शाळा कॉलेज विद्यार्थी यांना लायसन्स नसताना कोणीही त्यांच्याकडे दुचाकी देऊ नये. पालकांनीही याबाबत काळजी घ्यावी. तसेच भरधाव वेगात ट्रिपलसीट दुचाकी चालकांवरही नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी नियमांचे पालन सर्वांनी करावे. असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page