पखवाज स्पर्धेत सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा रथराज तुरी प्रथम

⚡मालवण ता.१०-: मुंबई विद्यापीठ संलग्न, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पखवाज वादन स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.रथराज तुरी या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेच्या तयारीसाठी रथराज याला पखवाज विशारद गुरुवर्य सचिन कातवणकर यांचे मार्गदर्शन आणि वडील धोंडू शांताराम तुरी तसेच प्रा.शंकर खोबरे यांचे सहकार्य लाभले. रथराज तुरी याच्या यशाबद्दल कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, सर्व पदाधिकारी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सामंत, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.एच. एम. चौगले, तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी रथराज तुरीचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page