भटवाडी शाळेत बळीराजासाठी एक दिवस उपक्रम उत्साहात

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी भेट देत दिल्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.१६-: कै.श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विदयालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा नं.6 भटवाडी सावंतवाडी या शाळेत बळीराजासाठी एक दिवस उपक्रम उत्सहात पार पडला विदयार्थ्यांना शेती विषयी माहिती मिळावी, शेती साठी वापरली जाणारी अवजारे, बीबीयाणी,खते याविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी सावंतवाडी नं 6 या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भटवाडी येथील शेतकरी श्री. मोहन गावडे यांच्या शेताला भेट देत विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. सर्वांनी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. त्यावेळी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केलें.

बालवाडी बाई सौ. गावडे , देऊ गावडे, मोहन गावडे या कुटुंबियांनी चांगले सहकार्य केलें. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली लांबर व उपशिक्षिका सौ. गीता सुतार मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी शिक्षणतज्ञ श्री.दिलीप भालेकर केंद्रप्रमुख सौ. स्नेहा लंगवे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page