⚡कणकवली ता.१६-: ज्ञानदा शिक्षण संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत शैक्षणिक वर्ष 2022- 2023 मध्ये मोफत “मार्शल आर्ट कमांडो प्रशिक्षण” उपक्रम सुरु करण्यात आला आहे ,स्वसंरक्षणासाठी आवश्यक असणारा असा आगळा वेगळा व विद्यार्थी भविष्यलक्षी उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदा राबविणारे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे हे स्कूल आहे.
मुलांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासास चालना मिळावी आणि भविष्यात सैनिकी प्रशिक्षणासाठी उपयुक्त व्हावे अशा या उपक्रमात रायफलिंग,शूटिंग,मल्लखांब,आर्चरी( धनुर्विद्या) , रोपखांब, अशा मैदानी खेळांचे प्रशिक्षण नामांकीत प्रशिक्षकांद्वारे दिले जाणार आहे.
अशा उपक्रमात सहभागी होऊन आयडियलच्या विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत व या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पालकवर्गाकडून स्वागत केले जात आहे.
