दुचाकीस्वाराला उपचारासाठी नेत असता वाटेतच त्याचे निधन
⚡सावंतवाडी,ता.१८-: तालुक्यातील सातार्डा चेकपोस्ट परिसरात अल्टो कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात दुचाकीस्वाराला उपचारासाठी नेत असता वाटेतच त्याचे निधन झाले .
हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या “त्या” दुचाकीस्वाराला बांदा येथे उपचारासाठी नेत असता वाटेत त्याचे निधन झाले. याबाबतची माहिती सातार्डा दुरक्षेत्राचे हवालदार गुरु नाईक यांनी दिली.
संबंधित दुचाकीस्वराची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्याला बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तत्पूर्वी त्याचे निधन झाले. मात्र हा अपघात सातार्डा येथे घडल्याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे नाईक म्हणाले.
