प्रवेशाची माहिती देण्यासाठी केंद्र सुरू

मळेवाड येथे यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम

सावंतवाडी –मळेवाड येथे श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भोसले कॉलेज मधील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया संदर्भात माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या माहिती केंद्राचा शुभारंभ भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ अस्मिता सावंत भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला.
दहावी बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला असून दहावी-बारावी नंतर काय असा प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या समोर उपस्थित होतो.यासाठी यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीकडून मळेवाड गावात माहिती केंद्रे सुरू केले आहे. या केंद्रांवर मुलांना भोसले कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे.मळेवाड दशक्रोषीतील मुलांना माहिती मिळावी यासाठी मळेवाड जकात नाका येथील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या व्यापारी संकुलात भोसले पॉलीटेक्निक कॉलेजचे माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.शुक्रवारी याचा शुभारंभ भोसले एज्युकेशन सोसायटी अध्यक्षा अध्यक्षा अस्मिता अच्च्युत भोसले यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला.यावेळी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा अस्मिता सावंत, भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक,नितीन साडये,सीआरपी इशा काळोजी,जयराम नाईक,अमित नाईक आदी उपस्थित होते.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उपसरपंच हेमंत मराठे यांनी भोसले एज्युकेशन सोसायटीकडून गेल्या वर्षी मळेवाड येथे माहिती केंद्र सुरू केले होते.यामुळे मळेवाड गावातील व लगतच्या इतर गावातील मुलांना इंजिनिअरिंग सह इतर महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती मिळाली आणि ती मुले आता यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. याहीवर्षी मळेवाड येथे मळेवाड दशक्रोशितील मुलांना सहज आणि जवळच्या जवळ इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची माहिती मिळावी यासाठी माहिती केंद्र सुरू केले याबद्दल भोसले एज्युकेशन सोसायटीचे गावाच्या वतीने आभार मानले.
फोटो ओळ —माहिती केंद्राचा शुभारंभ करताना अस्मिता भोसले सोबत सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे

You cannot copy content of this page