मालवणात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

दुसऱ्या दिवशीही दोन घरे फोडली

⚡मालवण ता.१८-: मालवण शहरात काल अज्ञात चोरट्यानी तीन बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असताना आज सलग दुसऱ्या दिवशी शहरातील दोन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे.

मध्यरात्री बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील स्मिता किशोर पाटकर यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून घरातील कपाटे फोडल्याची घटना घडली. कपाटातील सामान विखुरलेल्या अवस्थेत असले तरी यात चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे पाटकर कुटुंबीयांनी म्हटले आहे. या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीचे वीज कनेक्शनची वायर चोरट्यानी काढून ठेवल्याचे दिसून आले. तर याच घराच्या बाजूला असलेल्या हनुमंत श्रीधर पाटकर यांच्या घराचे कुलुपही तोडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. मात्र या घराच्या बाहेरील खोलीत सामान स्टोअर केलेले असल्याने चोरट्यांच्या हाती काही लागलेले नाही.

यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी घरफोडीची घटना समोर आल्याने मालवणात खळबळ उडाली आहे.

You cannot copy content of this page