कौस्तुभ पेडणेकर यांच्या ५० व्या वाढदिवसाचे निमित्त
⚡सावंतवाडी ता.१८-: मुक्ताई अॅकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त जुलै महिन्यात विदयार्थ्यांसाठी बुदधिबळ आणि कॅरम स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.विदयार्थी, पालक, मित्रपरीवार आणि कुटुंबिय यांच्या उपस्थितीत हा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.येत्या वर्षात अॅकेडमीतर्फे विदयार्थ्यांसाठी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये मोफत सेमिनार आणि स्पर्धा घेण्यात येणार आहे.तसेच गायन, नृत्य, वादय, चित्रकला, वक्तृत्व, अक्षर सुलेखन अशा उपक्रमांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी ऑक्टोबरमध्ये राज्यस्तरीय बुदधिबळ स्पर्धा आणि पुढील कालावधीत राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा मनोदय व्यक्त केला.यावेळी अॅकेडमीचे राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, भावेश कुडतरकर, आयुष राठोड, विभव राऊळ, राजेश विरनोडकर, प्रतिक देसाई, साक्षी रामदुरकर, यशराज गवंडे, योगी लेले, गार्गी सावंत या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
तसेच पुणे जिल्ह्यात सासवड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत तेरा वर्षे वयोगटात भावेश कुडतरकर याने अकरावा आणि नऊ वर्षे वयोगटात प्रतिक देसाई याने बारावा क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरांनी श्री.कौस्तुभ पेडणेकर यांना शुभेच्छा दिल्या.
