कोळेकर कुटुंबियांच्या घर बांधणीसाठी क्रीडाई बांधकाम क्षेत्रातील संघटनेने मदत करावी

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.१८-: शहरातील कोळेकर कुटुंबियांच्या घर बांधणीसाठी क्रीडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेने मदत करावी असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला या कुटुंबाच्या घराचे छप्पर बांधण्यासाठी सामाजिक बांधिलकी चे अध्यक्ष रवी जाधव यांनी ते काम हाती घेतले. परंतु, घराच्या भिंती कमकुवत असल्याने कामे वाढत गेला असून, आवश्यक तो निधी अजुन उपलब्ध झाला नसून, त्यासाठी क्रीडाइ संघटनेने सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन साळगावकर यांनी संघटनेला केले आहे.

You cannot copy content of this page