⚡बांदा ता.१७-: शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाली असून नियमित सुरू असलेल्या एसटी बसेस अजूनही बंद आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायी किंवा खाजगी वाहने करून ये-जा करावे लागते.
सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा व सावंतवाडी बांदा निगुडे मार्गे सातोसे बस दोन दिवसांत सुरू करावी, अशी मागणी मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी सावंतवाडी आगारप्रमुखांकडे केली आहे.
कोरोना त्यानंतर एसटी बस संपात थांबलेली नियमित एसटी अजूनही बंद आहेत. परिणामी याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळा तसेच महाविद्यालयात ये-जा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पायी किंवा खासगी वाहनांना अधिक पैसे देऊन जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी परवड थांबवून एसटी परिवहन महामंडळाने सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा व सावंतवाडी बांदा निगुडे मार्गे सातोसे एसटी बस तात्काळ सुरू करावी अशी मागणी युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी सावंतवाडी आगार प्रमुखांजवळ केली आहे. तसेच आगारप्रमुखांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याचे श्री.नाईक यांनी सांगितले.
