शिवसेना वागदे गाव शाखेमार्फत भात बियाणे वाटप

⚡कणकवली ता.११-: शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना वागदे गाव शाखा यांच्या मार्फत विभागप्रमुख तथा सरपंच रुपेश आमडोसकर व युवा सेना कणकवली तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर यांच्या सौजन्याने भात बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक सौ. नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उद्योजक रामू विखाळे, विभागप्रमुख तथा सरपंच रुपेश आमडोसकर, युवा सेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, रवींद्र गावडे, शाखाप्रमुख संभाजी घाडीगावकर, गणपत घाडीगावकर, शिरीष घाडीगावकर, विशाखा परब, विलास कदम, विनय घाडीगावकर, शरद सरंगले, विनय गावडे, सुनील गोसावी, शंकर घाडीगावकर, केशव घाडीगावकर, चंद्रकांत सरंगले, सदाशिव राणे, विंक्रांत सरंगले, बाळा आर्डेकर, अनंत परब, नामदेव सरंगले, विशाल आमडोसकर, दिलीप ताटे, शैलेश गावडे, आदेश गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अंकुर सोनम व श्री १०१ जातीचे २५० किलो बियानेचे वाटप वागदे येथे करण्यात आले.

You cannot copy content of this page