प.पु. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेसाठी ९ जुलै रोजी मतदान होणार

⚡कणकवली ता.११-: खारेपाटण येथील प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या सहकारी पतसंस्थेचा सन २०२२ – २३ ते २०२७ – २८ या कालावधी करीता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था सहाययक निबंधक कणकवली निवडणूक समितीच्यावतीने जाहीर करण्यात आला असून उमेदवार नामनिर्देशन पत्राची विक्री व स्वीकृती ८जून ते १४ जून २०२२ या कालावधीत होणार आहे.तर दि.९ जुलै २०२२ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती.प पु. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्य.अधीकारी अधिकारी शुभम मोरे यांनी दिली.


कणकवली, देवगड व वैभववाडी असे कार्यक्षेत्र असलेल्या प पु भालचंद्र महाराज पतसंस्थेत संचालकांच्या एकूण १२ जागासाठी होणाऱ्या निवडणुकीत सर्वसाधरण गट कणकवली तालुका – ४ जागा सर्वसाधारण गट वैभववाडी तालुका – २ जागा व सर्वसाधारण गट देवगड तालुका – १ जगा,तसेच महिला राखीव प्रवर्ग – २ जागा व अनु.जाती/जमाती प्रवर्ग – १ जागा,भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग – १ जागा,इतर मागास प्रवर्ग – १ जागा असे उमेदवारी आरक्षण जाहीर झाले असून याप्रमाणे निवडणूक होणार आहे.
७ जून २०२२ रोजी निवडणूक कार्यक्रम सहकार खात्याकडून जाहीर करण्यात आला असुन उमेदवारी नामनिर्देश पत्र विक्री व स्वीकृती दि.८जून ते १४ जून २०२२ पर्यंत सकाळी ११.०० ते दु. ३.०० या वेळात सहकारी संस्था निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय कणकवली येथे केली जाणार आहे. तर उमेदवारी नामनिर्देशन पत्राची यादी दि.१४ जून रोजी सायंकाळी ४.०० वाजता निवडणूक कार्यलयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी दि.१५ जून रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे.तसेच वैध उमेदवारी अर्ज अंतिम यादी दि.१६ जून रोजी स.११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. व ३० जून २०२२ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारी चिन्ह वाटप हे दि.१ जुलै २०२२ रोजी दु.१२ वाजता करण्यात येणार आहे.
तर प्रत्यक्ष मतदान ९ जुलै२०२२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत घेण्यात येणार असून याच दिवशी मतदान पूर्ण झालेनंतर अर्ध्या तासानंतर लगेच निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. सुनीता भांगले व तालुका सहकारी संस्था निवडणूक अधिकारी तथा साह्ययक निबंधक कणकवली यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकद्वारे हे कळविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page