⚡कणकवली ता.११-: संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या रोहिदासमंच स्मरणिका प्रकाशन सोहळा रविवार १२ जून २०२२ रोजी गोपुरी आश्रम सभागृह, ( नाईक पेट्रोलपंप समोर ) कणकवली या ठिकाणी दुपारी ठीक ३ वाजता संस्थेचे राज्याध्यक्ष सन्मा संजय कदम तसेच संस्थेचे संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे..
संत रोहिदास सेवाभावी संस्थेची स्थापना झाल्यापासून ते संस्थेचा तृतीय वर्धापन दिनापर्यंत संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमांचा लेखाजोखा या रोहिदासमंच स्मरणिकेत करण्यात आला आहे. तरी या भव्य दिव्य स्मरणिका प्रकाशन सोहळ्यासाठी संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका पदाधिकारी आणि तमाम रोहिदास समाजबांधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे राज्यसरचिटणीस पी. एन. मसुरकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस अंकुश किंजवडेकर यांनी केले आहे
