भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर यांनी तातडीने खडी केली बाजूला…
⚡बांदा ता.०७-: बांदा आंबोली मार्गावरून खडीची वाहतूक करताना निमजगा येथे रस्त्यावर खडी पडल्याने एका चारचाकी वाहनाला अपघात झाला असून, गाडी रस्ता शेजारील कठड्याला जाऊन आदळली आहे. तर त्याच रस्त्यावरून एक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जख्मी झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन रस्त्यावरची खडी बाजूला करून घेतली आहे.
निमजगा येथे शाळा असल्याने रस्त्यावर गतिरोधक आहेत. खडीची वाहतूक करणारे डंपर ओव्हरलोड खडी वाहतूक करत असल्याने गतिरोधक असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खडी रस्त्यावर पडून अपघातास कारणीभूत ठरत आहे. यावेळी सबंधित विभागाने यावर वेळीच लक्ष देऊन सबंधित वाहतूक मालकांवर कारवाई करावी अशी मागणी संदीप बांदेकर यांनी केली आहे.
