वीज समस्या ऑन दि स्पॉट सोडवण्यासाठी अधीक्षक अभियंता उद्या मालवणात

⚡मालवण ता.०७-: मालवण शहर व परिसरातील वीज ग्राहक व नागरिक यांच्या समस्या अथवा प्रलंबित तक्रारी असल्यास त्या जाणून घेण्यासाठी तसेच ज्या समस्या तात्काळ सोडवणे शक्य आहे त्या ऑन दि स्पॉट सोडवण्यासाठी अधीक्षक अभियंता कणकवली व अधिकारी टीम बुधवार ८ जून रोजी सकाळी ११ वाजता मालवण वीज वितरण कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार वीज वितरणच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात येत आहे. तरी ज्या वीज ग्राहक व नागरिकांच्या तक्रारी, समस्या असतील त्यांनी उपस्थित राहावे. असे आ वाहन मालवण तालुका शिवसेना व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page