मालवण रेवतळे येथील स्मशानभूमी नूतनीकरण कामाचा शुभारंभ

⚡मालवण ता.०७-: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मालवण शहरातील रेवतळे स्मशानभूमीचे नूतनीकरण कामाचा शुभारंभ रेवतळे येथील ज्येष्ठ नागरिक राजन बादेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.

या कामासाठी आमदार वैभव नाईक यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी पाठपुरावा केला. यावेळी श्री. कांदळगावकर, श्री. केणी, माजी नगरसेविका शीला गिरकर, उमेश मांजरेकर, राजू आंबेरकर, अमेय भालेकर, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, शशी आचरेकर, भाऊ आकेरकर, नितीन हडकर, सागर नरे, सुदेश हिर्लेकर, सचिन कांबळे, किरण हिर्लेकर, यशवंत गावकर, नाना गावकर, विद्याधर मडये, भाई कासवकर, प्रवीण आंबेरकर, किसन मांजरेकर, अनिकेत फाटक, गोपी देसाई, प्रकाश वरवडेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page