…अन्यथा 15 जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण:अण्णा कोदे

⚡कणकवली ता.०७-: कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व्हिसरोडवर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आजबाजूच्या परिसरात अपघात घडत आहेत. येत्या आठ दिवसांत शिवरायांचा पुतळा स्थलांतरीत करण्यात यावा, अन्यथा 15 जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशारा भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी प्रांताधिकारी यांना दिला आहे. याबाबतचे निवेदन शिरस्तेदार श्री.नाईक यांना दिले आहे.

कणकवली शहरातील सर्व्हिसरोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतर करण्यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्‍वासन दिले होते. या संदर्भात नगरपंचायतीच्या सभागृहात बैठक घेऊन चर्चा करून 1 महिन्याच्या आत या संदर्भात योग्य तो तोडगा काढून पुतळा स्थालांतरित करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांकडून सांगण्यात आले.

मात्र, जून महिना आला तरी पुतळा स्थालांतरणाबाबत कोणताही कार्यवाही झालेली नाही. 14 जूनपर्यंत पुतळ्या स्थलांतर करण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास 15 जूनला छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशारा श्री. कोदे यांनी प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन सादर करतेवेळी नगरसेविका मेघा गांगण, शिशीर परुळेकर, महेश सावंत, प्रवीण पाटील, प्राची कर्पे, सागर राणे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page