कणकवली नगरवाचनालयात शिवराज्याभिषेक
दिन साजरा
⚡कणकवली ता.०७-: छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार व विचार महान होते. शिवरायांचे आचार व विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजेत. तसेच शिवाजी महाराजांचे शिवचरित्र विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे, असे प्रतिपादन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे यांनी केले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येथील नगरवाचनालयात व्याख्यानाचा कार्यक्रम
आयोजित केला होता. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कणकवली नगरवानालयाचे कार्यवाह
हनीफ पीरखान, कार्यकारिणी सदस्य वैजंयती करंदीकर, सूर्यकांत चव्हाण, उदय
सर्पे, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक भरत सरवदे, शिक्षक अच्युत वणवे, श्रीमती
जाधव, वाचनालयाचे लिपीक राजन ठाकूर, सहाय्यक लिपीक स्नेहल चव्हाण आदी
मान्यवर उपस्थित होते.
स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय काय केले हे श्री. तानवडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त
शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण मान्यवरांनी त्यांना अभिवादन
केले. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी वाचनप्रेमींनी गर्दी केली होती.
