⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व तालुका प्रवासी संघ कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ११ जूनला सकाळी ९ ते १२.३० या वेळेत कनेडी येथील मोहन मुरारी सावंत प्राथामिक आरोग्य केंद्रात नेत्रचिकित्सा तपासणी शिबीर आयोजित केले आहे .
या शिबिरात रोटीना चेकअप , मोतीबिंदू चष्म्याचा नंबर आदी तपासण्या करण्यात येणार असून आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे . याशिवाय मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत . नेत्रतज्ज्ञ डॉ . अशोक कदम , डॉ . सिद्धार्थ तांबे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत . या शिबिरात सहभागी होणाऱ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ मुसळे ( ९ ४२२३ ९ ४५८४ ) , मनोहर पालेयकर , मनीषा सावंत , डॉ . विनय शिरोडकर यांच्याकडे संपर्क साधून नावनोंदणी करावी , असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे .
