भाजपा भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुखपदी दर्शन गोसावी यांची निवड

⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द गावातील भाजपचे कार्यकर्ते दर्शन गोसावी यांची भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली.

भाजप आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली व भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी ही निवड जाहीर केली. जिल्ह्यातील भटके-विमुक्त आघाडी मजबूत करण्याकरिता व आघाडीचे काम जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काळे यांनी संघटनात्मक नियुक्तीपत्र देऊन गोसावी यांनी मीडिया प्रमुख पदी निवड केली.गोसावी यांना त्यांच्या निवडी बद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page