⚡देवगड ता.०७-: भारतीय जैन संघटना कोकण विभाग आयोजित (रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग)
विभागीय कार्यकर्ता मेळावा १२ जुन स.९.ते ११.३० या वेळात महावीर भवन राजस्थान कॉलनी माणगाव (जि. रायगड) या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड ,राष्ट्रीय महामंत्री समप्रतिजी जैन,प्रदेश अध्यक्ष हस्तीमलजी बंब,राज्य सचिव ऍड अभयजी सेठिया ,उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात राष्ट्रीय अधिवेशन उदयपूर (राजस्थान),संघटनेत होणारे बदल ,BJS-vision 2030,समाज उत्थान इत्यादी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी या कार्यकर्ता मेळाव्यात रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग मधील महिला पुरुष कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय अध्यक्ष बाबूलालजी जैन,विभागीय सचिव राकेश जैन जिल्हा अध्यक्ष रायगड,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
