कोपसापतर्फे सावंतवाडीत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे स्मरण

छत्रपती शिवरायांना सदस्यांकडून मानाचा मुजरा

⚡सावंतवाडी ता.०७-: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळ्याचे स्मरण सावंतवाडी नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षात करण्यात आले. याप्रीत्यर्थ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात येऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कोमसापचे सावंतवाडी शाखा अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम, डॉ. दीपक तुपकर, राजन तावडे, प्रा. रुपेश पाटील, प्रा. सुभाष गोवेकर, सौ. मंगल नाईक- जोशी, प्रा. प्रतिभा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page