मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या साहिशला राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक

सावंतवाडी ता.०७ सहदेव राऊळ-: हुबळी ओपन शुटींग चॕम्पियनशिप कर्नाटक २०२२ स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल या प्रकारात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या साहीश दिगंबर तळणकर यांने १७ वर्षाखालील गटात ६००पैकी ५५७ गुण मिळवत रौप्य पदक पटकावले आहे.

यापूर्वी देखिल साहीशने डेरवण, अहमदाबाद, दिल्ली , भोपाळ येथे झालेल्या विविध स्पर्धात यश मिळविले आहे. तसेच भारतीय नेमबाजी संघ निवड चाचणीत देखिल त्याची निवड झाली आहे.

त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर , आंतराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आईवडीलांचे सहकार्य त्याला नेहमीच असते. या यशाबद्दल संस्था सचिव मा. आर. आर. राऊळ, अध्यक्ष शिवराम मळगावकर, खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सावंत, पर्यवेक्षक फाले सर ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती, पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page