निरवडे ग्रामपंचायत येथे उद्या मालवणी मिरग संमेलन

⚡सावंतवाडी ता.०७-: निरवडे येथे उद्या बुधवार 8 जून रोजी सायंकाळी 7 वाजता निरवडे ग्रामपंचायत व मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणी मिरग संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनावेळी निरवडे सरपंच हरी वारंग, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, सावंतवाडी नायब तहसीलदार मनोज मुसळे, कोकण मराठी साहित्य परिषद तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, प्रसिद्ध कवी दादा मडकईकर, सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रा. गोवेकर सर आदी उपस्थित राहणार अाहेत. यावेळी कोकणी कविता, गझल व काव्य हे प्रकार सादर केले जाणार आहेत. यामध्ये स्थानिक कवी, कॉलेज युवक युवती भाग घेणार आहेत. या कवी संमेलनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निरवडे सरपंच हरी वारंग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page