⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी येथे सोमवारी जिजाऊ बचतगट महासंघ सिंधुदुर्गची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष महेश पांचाळ, अजित सुभेदार,साक्षी गवस, अस्मिता भराडी, नेहा काष्टे, सोनम मांजरेकर, दिव्या कांबळी आदी उपस्थित होते.
बचतगटांना उद्योगासंदर्भात प्रशिक्षण देणे, तसेच उद्योगासाठी लागणारा कच्चामाल देणे व तयार पक्कामाल खरेदी करणे, बचतगट संकल्पना फक्त महिलांपुरती न ठेवता बेरोजगार युवकांना एकत्र करुन बचतगट स्थापन करुन त्यातून रोजगार निर्मिती करणे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करण्याचे मुख्य उदिष्टडोळ्यासमोर ठेवून या महासंघाची स्थापना करण्यात आली आहे.
तसेच ग्रामीण भागातील शेतकरी पिकवत असलेल्या उत्पादनांचे मार्केटींग या बचतगटाच्या माध्यमातुन करण्यात येईल. या महासंघातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा व रोजगाराचा जास्तीत जास्त बचतगटांनी लाभ घ्यावा यासाठी साक्षी गवस 8605358977, अस्मिता भराडी, 8605251590, सोनम मांजरेकर 9145159488 यांच्याशी जास्तीत जास्त बचतगटांनी संपर्क साधावा. असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष महेश पांचाळ यांनी केले.
