माझा सिंधुदुर्ग ग्रुपतर्फे शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न

मालवण ता.०६-:* सिंधुदुर्ग मधील मुंबईस्थित तरुण युवकांचा माझा सिंधुदुर्ग या ग्रुपतर्फे सिंधुदुर्ग मधील हुशार, होतकरु व विशेषतः कोविड काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी संपुर्ण वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती प्रदान सोहळा कुडाळ येथे संपन्न झाला.

यावेळी चित्रपट दिग्दर्शक,निर्माता श्री.साई जळवी, पत्रकार शेखर सामंत , राज्यपुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.शिवराज सावंत, कातकरी समाजातील मुलांसाठी वसतीगृह चालविणारे श्री.उदय आईर, श्री.संदिप तुळसकर, श्री.अंकुश कणेरकर सर, श्री.संजय जाधव, माझा सिंधुदुर्गचे संस्थापक श्री.विकास पालव, मयेकारीन फेम सौ. अर्चना परब व माझा सिंधुदुर्गचे सर्व क्रियाशील सदस्य उपस्थित होते. यावेळी कातकरी मुलांच्या वसतीगृहासाठी इन्व्हर्टर श्री.उदय आईर यांना माझा सिंधुदुर्ग कडुन प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शुभम धुरी यांनी केले.

You cannot copy content of this page