मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी पदी आप्पासाहेब गुजर

मालवण ता.०६-:* मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी पदी आप्पासाहेब रामचंद्र गुजर यांची नियुक्ती करण्यात आली असून आज सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगांवकर, श्रावण सरपंच प्रशांत परब व पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

सोलापूर अकलूज हे मूळ गाव असलेले आप्पासाहेब गुजर यांनी कृषी अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्यात बारामती दौंड येथे १८ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून मावळ, मुळशी, हवेली या पंचायत समिती ठिकाणी त्यांनी नऊ वर्षे कार्यभार पाहिला. त्यांची पदोन्नतीने मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी पदी बढती नियुक्ती देण्यात आली आहे. मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांची रत्नागिरी येथे पदोन्नती झाल्याने आप्पासाहेब गुजर यांची गटविकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page