सावंतवाडी ता.०६-:* शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आज शिवस्वराज्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा नंबर ४ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या उत्साहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेशुभूषा करून संपूर्ण सावंतवाडीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे राजे खेम सावंत – भोसले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप भारमल, सदानंद सावंत, प्राध्यापक सचिन देशमुख, डी. जी बोर्डे, निलम धुरी, प्रगती अमृते, यु.सी.पाटील, सी. ए. नाईक, माधव भिसे, अनिल गवळी, टी. व्ही. कांबळे, सोमेश्वर सावंत आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीचा शुभारंभ येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात करण्यात आला. तेथून ही मिरवणूक संपूर्ण शहरात फिरवण्यात आली. यावेळी जय भवानी…! जय शिवाजी…! अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
