युरेका सायन्स सेंटर व सह्याद्री निसर्ग ग्रुप नाटळतर्फे 1000 बियाणांचे बीजारोपण

*⚡कणकवली ता.०५-:* 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युरेका सायन्स सेंटर व सह्याद्री निसर्ग ग्रुप नाटळ यांनी थोरले मोहोळ घोटीचा कणा या ठिकाणी फणस ,आंबा, चिकू ,काजू ,रतांबा ,जांभूळ बाहवा ,बेहडा , तसेच इतर जंगली वनस्पती यांच्या जवळ जवळ 1000 पेक्षा जास्त बियाणांचे बीजारोपण केले डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराच्या कड्यापर्यंत देशी वनस्पती ज्या बहुपयोगी आहेत , औषधी आहेत तसेच जंगलातील पशुपक्ष्यांना त्यांची फुले फळे पाने यांचा खाद्य म्हणून उपयोग होईल व मनुष्य वस्तीतील त्यांचा वावर कमी होईल .

त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता वाढावी ,जमिनीचा पीएच व्हॅल्यू वाढावा अशा बियाणांचे आज बीजारोपण केले. यामध्ये फणस ,आंबा, चिकू ,काजू ,रतांबा ,जांभूळ बाहवा ,बेहडा , तसेच इतर जंगली वनस्पती यांच्या जवळ जवळ 1000 पेक्षा जास्त बियाणांचे बीजारोपण केले . यामध्ये सुषमा केनी, शितल वाळके ,दयानंद केनी डॉ पराग मुंडले यांच्यासमवेत 25 मुलांचा सहभाग होता. सकाळी 7 वाजता या मोहिमेला प्रारंभ होऊन दुपारी 12 वाजेपर्यंत बीजारोपण करीत आजचा पर्यावरण दिन कृतीतून साजरा केला.

डोंगराच्या पायथ्यापासून झाडीतून वाट काढत मुले डोंगराच्या कड्यावर पोहोचली .

त्यांच्या दृष्टीने हा वेगळाच अनुभव होता . पुस्तकात पाहिलेले पक्षी कीटक आज प्रत्यक्ष पाहता आले.निसर्गातील अनेक पशुपक्षी ,साप ,कीटक, वनस्पती मुलांना जवळून पाहता आले. ही सर्व मुलं तहान भूक विसरून निसर्गाशी एकरूप होऊन गेली होती .निसर्गाचे आपण जतन केले पाहिजे अशी भावना प्रत्येक मुलामध्ये होती. या जंगली पशु पक्ष्यांचे खाद्य आपण जंगल तोड करून हिरावून घेत आहोत आणि त्यामुळे त्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढत आहे. जागतिक तापमान वाढ नियंत्रित ठेवणे आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी आपण व्यावहारिक उपयुक्त झाडांबरोबर अशा जमली झाडांचे रोपण केले पाहिजे, याची जाणीव या मुलांना झाली.

You cannot copy content of this page