कणकवली ता.०५-:* कणकवली तालुक्यातील तोंडवली – बावशी येथील स्वाभिमान ग्रामसंघाला प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच स्वाभिमान ग्रामसंघातील महिलांनच्या सक्षमीकरण ‘सामाजीक व सांस्कृतीक कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसादाबद्दल कौतुक म्हणून या ग्रामसंघाला सामाजिक कार्यकर्ते व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी कपाट भेट दिले.
यावेळी तोंडवली सरंपच मनाली गुरव , उपसरपंच अशोक बोभाटे, माजी सरपंच उमेश कुडतरकर पंढरी वायंगणकर ,भाई मोरजकर , कमलेश पाटील ,रवि बोभाटे , सानीका गावडे ,दिनेश कांडर,जगन्नाथ ऊर्फ बाबा केसरकर ,मयुरी बोभाटे, अंगणवाडी सेविका ज्योती भाट,शिल्पा मत्तलवार,प्रेरणा नाडकर्णी तसेच तोंडवली बावशी येथील महीला बहुसंख्येने उपस्थित होते .स्वाभिमान ग्रामसंघाला प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच स्वाभिमान ग्रामसंघातील महिलांनच्या सक्षमीकरण ‘सामाजीक व सांस्कृतीक कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसादाबद्दल कौतुक म्हणून स्वाभीमान ग्रामसंघाला पंढरी वायंगणकर यांनी कपाट भेट दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका शिल्पा मत्तलवार यांनी केले आहे.
