उभादांडा येथे ५ रोजी ‘प्रल्हाद पुत्र विरोचन‘ संयुक्त नाटक

वेंगुर्ला ता.०३-:* उभादांडा-नमसवाडी येथे रविवार दि.५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता ॐकार दशावतार नाट्य मंडळ उभादांडा प्रस्तुत ‘प्रल्हाद पुत्र विरोचन‘ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग आयोजित केला आहे.

या नाटकात अजित खानोलकर, पुरुषोत्तम खेडेकर, सुशिल रेडकर, नितीन आसयेकर, पपू घाडीगांवकर, नितीन घाडीगांवकर, महेंद्र कुडव, महेश गवंडे, सुहास गावडे, गौतम केरकर, गणेश गावडे आदी कलाकार भूमिका साकारणार असून यांना पपू घाडीगांवकर (हार्मोनियम), कौशल मेस्त्री (पखवाज) व योगेश मेस्त्री (तालरक्षक) आदी संगीतसाथ करणार आहेत. तरी नाट्यरसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक श्री देव ब्राह्मण मंदिर देवस्थानतर्फे केले आहे.

You cannot copy content of this page