लोकराज्य मंचची कार्यकारिणी जाहीर

वेंगुर्ला ता.०३-:* लोकराज्य मंच कार्यकारिणीची बैठक नुकतीच मंचच्या कार्यालयात संपन्न झाली. यात अध्यक्षपदी डॉ.श्रीनिवास गावडे, उपाध्यक्षपदी आनंद मोचेमाडकर, सचिव राजेश परब, महिला प्रतिनिधी म्हणून श्रेया मयेकर, तर सदस्य म्हणून डॉ.रुपाली पाटील, दशरथ नाईक, शेखर चोपडेकर, सुनिल परब, निता कार्डोज यांची निवड करण्यात आली.

लोकराज्य मंच गेली ५ वर्षे कार्यरत आहे. प्रत्येक सदस्यांना विभागवार जबाबदारी देऊन वेंगुर्ला तालुका विकास उद्देशाने लोकराज्य मंच काम करीत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कार्य करणार असल्याचे मुख्यप्रमुख डॉ.श्रीनिवस गावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page