वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.५ जून २०२२ रोजी स. १० वा. (कोरमअभावी १०.३० वा.) साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे आयोजित केली आहे.
या सभेत मागील दि.१६-१०-२०२१च्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२१-२२ चा अहवाल व जमाखर्च मंजूर करणे, सन २०२२-२३च्या अंदाजपत्रकावर विचार करुन मंजूर करणे, सन २०२२-२०२३ सालासाठी हिशेब तपासनीस नेमणूक करणे आणि आयत्या विषयांवर चर्चा होणार आहे. तरी सदस्यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष रा.पां.जोशी आणि कार्यवाह ज.द.तिरपुडे यांनी केले आहे.
