जिल्हाधिकारी यांनाही दिले निवेदन
सिंधुदुर्ग ता.०३-:* जिल्हा काँग्रेसचे ओसरगाव येथे अनोख्या पद्धतीने टोल विरोधी आंदोलन करण्यात आले. ओसरगाव येथील आंदोलना पूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.हे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, सरचिटणीस प्रकाश जैतापकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
दिलेल्या त्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होवून जमीन अधिग्रहणांसंबधीत प्रश्न सोडवून संबंधित प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळत नाही तो पर्यंत टोल आकारण्यात येवू नये तसेच सदर महामार्ग पूर्ण झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनधारकांना टोल मधून संपूर्ण माफी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदनात द्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
नाक्यावर आमच ठरलय.. आम्ही सिंधुदुर्गकर टोल भरणारनाही
असे स्टीकर येणाऱ्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणीकृत असणाऱ्या गाड्यांवर लावून अनोख्या पद्धतीने काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी टोल न भरण्यासंदर्भात अनेक घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला. यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
