कारच्या धडकेत पादचारी जागीच ठार

इन्सुली कुडवटेंब येथील दुर्दैवी घटना

बांदा ता.०३-:* मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली कुडवटेम्ब येथे पुण्याहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारने पादचाऱ्याना धडक दिली. या धडकेत इन्सुली कुडवटेम्ब येथील महादेव वसंत झाट्ये (वय ४५) हे जागीच ठार झाले. तर विलास कुडव हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमीवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. सदर कारमधील युवक पर्यटनासाठी गोवा येथे जात होते. तर पादचारी दोघेही रस्त्याच्या कडेला उभे होते. हा अपघात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी बांदा पोलीस दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page