देऊळवाडी पुरुषोत्तम वालावलकर यांचा दुर्दैवी अपघात
मालवण दि प्रतिनिधी मालवण देऊळवाडा येथील पुरुषोत्तम महादेव वालावलकर (वय ५३) या इसमाचा सायकल वरून घरी परत येत असताना मालवण एसटी स्टँड समोरील मुख्य रस्त्यावर चक्कर येऊन पडल्यानंतर मृत्यू ओढवल्याची घटना घडली आहे.
पुरुषोत्तम वालावलकर हे मालवण देऊळवाडा येथे एकटेच राहत होते ते अविवाहित होते आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुरुषोत्तम हे आपल्या सायकलवरून देऊळवाडा येथील आपल्या घराच्या दिशेने येत होते. ते एसटी स्टँड समोरील रस्त्यावर आले असता त्यांना त्यांना चक्कर आल्याने ते रस्त्यावर कोसळले. यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात दोन भाऊ,एक बहीण,भावजय ,भावोजी, पुतणे, भाचे असा परिवार आहे
