तंत्रशिक्षण कडून प्रवेशप्रक्रिया कागदपत्रांची यादी जाहीर

मालवण ता.०२-:* तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे, ही कागदपत्रे तयार ठेवून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे. पंधरा ते वीस दिवस आधीच ही यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे.

विद्यार्थ्यांनी या वेळेचा सदुपयोग करत आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रम म्हणजेच पॉलिटेक्निक तसेच इतर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच सुरू करण्यात येणार आहेत यासाठी लागणाऱ्या सर्व प्रमाणपत्रांची यादी संचालनालयाकडून देण्यात आलेली असून ही कागदपत्रे तयार ठेवून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे.

प्रवेशासाठी जात-जमात प्रमाणपत्र , नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र(EWS), सैन्यदलातील प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, अल्पसंख्यांक प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र आधार क्रमांक व संलग्न बँक खाते अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी प्राध्यापक गोलतकर 9764513133 व प्राध्यापक डॉ. योगेश महाडिक 9423682846 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page